बजेट पुस्तकापुरतेच मर्यादित राहणार नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:31+5:302020-12-09T04:08:31+5:30
पदवीधर मतदार संघात महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला. याला शहरातील विकास कामे करण्यात नगरसेवकांना अपयश आल्याचेही कारण आहे. ...

बजेट पुस्तकापुरतेच मर्यादित राहणार नाही ?
पदवीधर मतदार संघात महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला. याला शहरातील विकास कामे करण्यात नगरसेवकांना अपयश आल्याचेही कारण आहे. मनपात स्पष्ट बहुमत असूनही सत्तापक्षाचा ढिलेपणा समजण्यापलीकडे आहे. आचारसंहिता संपल्यावर मनपातील पदाधिकाऱ्यांनी अद्याप मनपातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांना सुरुवात का झाली नाही, याची विचारणा केलेली नाही.
........
फाईल प्रलंबित ठेवण्याचे प्रयत्न
कंत्राटदारांची १८० कोटींची बिले थकीत आहेत. त्यात कार्यादेश झालेली कामे सुरू करण्यासाठी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार झोनस्तरावरून प्रस्ताव मागून फाईल आपल्याकडे यावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वास्तविक सर्व प्रकारच्या मंजुरीनंतरच कार्यादेश दिले जातात. फाईल फिरत राहिल्यास कामे कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
...
कामांना लवकरच सुरुवात - झलके
बजेटमध्ये प्रत्येक कामासाठी तरतूद केली असून प्रारूप निश्चित केले आहे. फक्त कालावधी वाढवायचा आहे. यासाठी नोटीस जारी करता येते. कार्यादेश झालेली कामे लवकरच सुरू होतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करू, सत्तापक्षाची पकड नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके म्हणाले.