शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Budget 2020 : -तर आयकरच्या जुन्या प्रणालीत परत येणे अशक्य : सीए कैलास जोगानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:53 IST

करदाते एकदा या नवीन करप्रणालीत आले तर त्यांना पुन्हा जुन्या करप्रणालीत परत जाता येणार नाही, अशी माहिती सीए कैलास जोगानी यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे ‘एनसीसीएल’तर्फे बजेटवर विश्लेषण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अर्थसंकल्पात वैयक्तिक करदाते आणि एचयूएफकरिता आयकरचे नवीन कलम ११५ बीएसीअंतर्गत नवीन आयकर स्लॅब दिल्या आहेत. त्यात कराचे दर कमी आहेत, परंतु त्यातील सर्वच वजावटी हटविण्यात आल्या आहेत. करदाते एकदा या नवीन करप्रणालीत आले तर त्यांना पुन्हा जुन्या करप्रणालीत परत जाता येणार नाही, अशी माहिती सीए कैलास जोगानी यांनी येथे दिली.नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी यांनी अर्थसंकल्पीय विश्लेषण केले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला होते. जोगानी म्हणाले, नवीन प्रणालीचे फायदे आणि नुकसानही आहेत. आता कंपन्यांवर लाभांश वितरण कर लागणार नाही. भागीदारी फर्म वा कंपनीच्या कराच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ऑडिटची मर्यादा ५ कोटींवर नेताना वित्तमंत्र्यांनी ५ टक्क्यांपेक्षा जास्त रोखीची प्राप्ती तसेच ५ टक्क्यांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार असू नये, अशी अट टाकली आहे. आता कंपनीने करदाते तसेच ऑडिटअंतर्गत येणाऱ्या करदात्यांची रिटर्न फायलिंगची तारीख ३० सप्टेंबरहून वाढवून ३१ ऑक्टोबर केली आहे. पण टॅक्स ऑडिट अहवाल ऑनलाईन फाईल करण्याची तारीख यथावत ३० सप्टेंबर राहणार असल्याचे जोगानी यांनी सांगितले. आता सर्व जुन्या आणि नवीन चॅरिटेबल व अन्य संस्थांना ऑनलाईन नव्याने नोंदणी करावी लागणार आहे.जीएसटीमध्ये झालेल्या बदलांची माहिती देताना सीए रितेश मेहता म्हणाले, कम्पोझिशन स्कीम, नोंदणी, इनपूट टॅक्स क्रेडिट इत्यादीच्या तरतुदीत बदल केल्याने व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे.संचालन चेंबरचे सहसचिव तरुण निर्बाण यांनी तर विवेक मुरारका यांनी आभार मानले. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष गोविंद पसारी, माजी अध्यक्ष महेंद्र कटारिया, भागीरथ मुरारका, कमलेश शाह, कोषाध्यक्ष वेणुगोपाल अग्रवाल, संचालक विजय जयस्वाल, विपीन पनपालिया, पुरुषोत्तम ठाकरे, देवकीनंदन खंडेलवाल, जवाहरलाल चुग, सुदर्शन मदान, ओमप्रकाश अग्रवाल, साजनकुमार गोयल आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :budget 2020बजेटchartered accountantसीएIncome Taxइन्कम टॅक्स