महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आता भाजपमधील बौद्ध कार्यकर्तेही सरसावले
By आनंद डेकाटे | Updated: March 31, 2025 19:06 IST2025-03-31T18:12:19+5:302025-03-31T19:06:43+5:30
Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट

Buddhist activists in BJP have now also come forward for the liberation of Mahabodhi Mahavihar.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी बुद्धगयेला मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहेत. देशातील प्रत्येक भागात या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आता नागपुरातील भाजपमधील बौद्ध कार्यकर्तेही पुढे आले आहेत.
भारतीय जनता पार्टी नागपूर शहर व ग्रामीण विभागातील प्रमुख बौद्ध कार्यकर्त्यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बुद्धधगया टेंपल ॲक्ट-१९४९ हा रद्द कारुन महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी लावून धरली.
यावेळी शिष्टमंडळाशी बोलतांना गडकरी यांनी "मी या प्रकरणात लक्ष घालेन व बिहार राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्र देऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल" असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार डॉ. मिलिंद माने, अशोक मेंढे, ॲड. धर्मपाल मेश्राम, संदीप जाधव, नेताजी गजभिये, सुधीर जांभुळकर, अरविंद गजभिये, मनोज चवरे, सुरेंद्र शेन्डे, रिंकेश चवरे, उषाताई पायलट, अभय गोटेकर, रमेश वानखेडे, अंबादास उके, संघपाल काळे, मनिष मेश्राम, ॲड. राहुल झामरे, बंडू शिरसाट, अविनाश धमगाये, वत्सला मेश्राम, मोहिनी रामटेके, राखी मानवटकर, संजय भगत, बागडे ताई, बंडू गायकवाड, रोहण चांदेकर, सुधीर घोडेस्वार, शंकर मेश्राम, स्वप्नील भालेराव, विनोद कोटांगले, वैशाली साखरे, इंद्रजित वासनिक, विशाल साखरे, उपेन्द्र वालदे, अमिताभ मेश्राम, कैलाश कोचे, डॉ. विजय गजबे, धनंजय कांबळे यांचा समावेश होता.