शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बुद्धसूर्य विहार, नागलोक धम्म ज्ञानाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:07 PM

बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील बुद्धसूर्य विहार.

ठळक मुद्देराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख५६ फूट उंचीची तथागत गौतम बुद्ध यांची चलीत मूर्ती

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील बुद्धसूर्य विहार. आपल्या अल्प काळातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धम्म ज्ञानाचे हे विहार केंद्र ठरले आहे. शिवाय, भारतातील बुद्ध लेण्यांना आधुनिक स्वरूप देऊन निर्माण केलेली ही वास्तू आहे. येथे मैत्रेय बुद्धाची आकर्षक मूर्ती स्थापित आहे. ४०० धम्म बांधव एकत्र बसून प्रशिक्षण घेतील एवढे प्रशस्त दालन आहे. परिसरात असलेली ५६ फूट उंचीची तथागत गौतम बुद्ध यांची चलित मूर्ती आणि सभोवतालच्या सौंदर्यीकरणाने या विहाराला एक आकर्षक रूप आले आहे.बौद्धधम्माच्या व आंबेडकरी विचारांच्या प्रचार व प्रसारासोबतच धम्म प्रशिक्षण केंद्र असावे या विचारातून या बुद्ध विहाराची स्थापना करण्यात आली. त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्यावतीने कामठी रोड नागलोक परिसरातील बुद्धसूर्य विहाराचे लोकार्पण १२ आॅक्टोबर १९९७ रोजी डॉ. यो सिंग चाऊ यांच्या हस्ते झाले. धम्मचारी लोकमित्र यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेला हा नागलोक परिसर साडेचौदा एकरमध्ये विस्तारलेला आहे. येथील इतर वास्तूंपैकी बुद्ध विहार हे एक आकर्षण आहे. या बुद्ध विहाराचे वैशिष्ट्य म्हणजे, एकाचवेळी ४०० लेक बसू शकतील एवढे प्रशस्त विहार आहे. भारतात आढळून येणाऱ्या ऐतिहासिक बुद्ध लेण्यांना आधुनिक रूप देऊन या बुद्ध विहाराची रचना करण्यात आली आहे. अजंठा बुद्ध लेणीतील मुख्य स्तुपात असलेल्या मैत्रेय बुद्ध मूर्तीची प्रतिकृती येथे स्थापन करण्यात आली आहे. मैत्रेय बुद्धाचे हे रूप धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत आहे. अमेरिकेचे जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार ख्रिस्टोफर बेनिन्जर यांनी या विहाराची रचना केली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार शरद कापूसकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती तयार केली आहे. ब्रान्झ धातूची असलेली ही मूर्ती १२ फूट उंच आहे.‘आयनेब’ धम्म परिषदया विहारामध्ये ‘आयनेब’ सारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धम्म परिषदा आयोजित केल्या जातात. देशभरातील बौद्ध तरुण-तरुणींसाठी निवासी धम्म प्रशिक्षण चालविले जाते, तसेच प्रत्येक रविवारी येथे धम्म वर्ग आयोजित केले जातात. तसेच नियमित धम्म शिबिरांचे व धम्म प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.दलाई लामा यांचा धम्मोपदेशया विहारात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा, व्हिएतनामचे धर्मगुरू थिक-न्हात-हान अशा बौद्ध विद्वानांनी धम्मोपदेश दिलेला आहे. यामुळे या बुद्ध विहाराला वेगळे महत्त्व आले असून एक आदर्श बुद्ध विहार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.पितळेची ५६ फूट उंच मूर्तीनागलोक परिसरात विहाराच्या अगदी समोर ५६ फूट उंचीची बुद्धाची चलित मूर्ती हे येथील आकर्षण आहे. विशेष म्हणजे, १५ हजार किलोची ही मूर्ती संपूर्ण पितळेची आहे. ही मूर्ती चीनमध्ये तयार झाली आहे. या बुद्ध मूर्तीच्या अगदी समोर बुद्धसूर्य विहाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.धम्म कार्यात यांची होत आहे मदतया विहारामधून सुरू असलेले धम्मकार्य धम्मचारी लोकमित्र यांच्या नेतृत्वात धम्मचारी विवेकरत्न, धम्मचारी नागमित्र, धम्मचारी सूवीर्य, धम्मचारी पद्मवीर, धम्मचारी प्रज्ञारत्न, धम्मचारी शीलवर्धन, धम्मचारिणी नीत्यश्री, धम्मचारी असंगवज्र व धम्मचारी नागदीप यांचे सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा