बीओटी प्रकल्पांच्या निविदा महिनाभरात

By Admin | Updated: November 3, 2014 00:41 IST2014-11-03T00:41:26+5:302014-11-03T00:41:26+5:30

बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शहरातील विविध डझनभर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केल्या जातील. या प्रकल्पांसाठी विविध विभागांची मंजुरी सध्या घेतली जात आहे.

B.Tech projects are tender in the month | बीओटी प्रकल्पांच्या निविदा महिनाभरात

बीओटी प्रकल्पांच्या निविदा महिनाभरात

मनपा स्थायी समिती बैठक : अधिकाऱ्यांनी सादर केला प्रगती अहवाल
नागपूर : बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शहरातील विविध डझनभर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केल्या जातील. या प्रकल्पांसाठी विविध विभागांची मंजुरी सध्या घेतली जात आहे. शनिवारी प्रलंबित प्रकल्पांसंबंधात स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीओटी प्रकल्पाच्या प्रगतीबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर केला.
सोख्ता भवन, सक्करदरा बुधवार बाजार, आॅरेंज सिटी स्ट्रीट, देवडिया दवाखाना, बैद्यनाथ चौक स्थित वर्कशॉप, अंबाझरी उद्यान, वाठोडा क्रीडा संकुल आदी कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना बाल्या बोरकर यांनी सांगितले की, भांडेवाडी सिवरेज प्लान्टमध्ये हॉटमिक्स प्लान्ट बनविण्याची योजना आहे. जमिनीचा वापरकर्ता बदलवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागण्यात आलीआहे. लंडन स्ट्रीट (आॅरेंज सिटी स्ट्रीट) चे आरएफटी तयार झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होईल. अंबाझरी उद्यानासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी मागण्यात आली आहे. सर्वात उंच ध्वज लावण्याच्या प्रस्तावावर सिव्हील एव्हिएशन विभागाला परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच निविदा काढण्यात येईल. रस्त्यांच्या मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्याचे काम सुरू आहे.
यासाठी २५ कोटी रुपये महावितरणकडून घ्यायचे आहे तर एमएसआरडीसीकडून २५ कोटी रुपये आयआरडीपी रोडच्या ऐवजमध्ये अ‍ॅडजेस्ट करण्यात येईल. टीटीएल (टर्न टेबल लेटर)ची निविदा काढण्यात आली आहे. परंतु दुसऱ्यांदा सुद्धा एकच निविदाकर्ता आला. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा निविदा काढण्यात येईल. (प्रतिनिधी)
हिवाळी अधिवेशनापूर्वी रस्ते होणार चकाचक
४आयआरडीपी अंतर्गत शहरात बनविण्यात आलेले रस्ते हिवाळी अधिवेशनापूर्वी चकाचक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या रस्त्यांसाठी डिफेक्ट लायबिलिटी पीरियड दोन वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे. स्ट्रीट लाईटला एलईडीने बदलवण्याचे काम सुरू आहे, असेही बाल्या बोरकर यांनी सांगितले.

Web Title: B.Tech projects are tender in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.