पदोन्नतीतील आरक्षणासाठी बसपाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 21:09 IST2021-06-03T21:09:32+5:302021-06-03T21:09:59+5:30
BSP protests for reservation in promotion पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी बसपाने संविधान चौकात निदर्शने केली.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी बसपाची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी बसपाने संविधान चौकात निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य व केंद्र सरकारला निवेदन सादर केले. पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्यासोबतच आरक्षणाचा बॅकलॉग पूर्ण भरावा, कोविड काळातील वीज बिल व घर टॅक्स माफ करा, प्रत्येक गरजू नागरिकांना दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या, कोविड मृतकांना प्रत्येकी दहा लाखाची मदत करा, परीक्षा फी प्रवेश फी रद्द करा, हाथाडी-माथाडी व निराधार कामगारांना आर्थिक मदत करा, कृषी विमा योजना अंमलात यावी, वसतिगृहे सुरू करावीत, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
या निदर्शनात नागोराव जयकर, उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, मंगला लांजेवार, इंजि. राजीव भांगे यांच्यासह विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, पृथ्वीराज शेंडे, अभिलेष वाहाणे, चंद्रशेखर कांबळे, राजीव भांगे, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील आदींचा समावेश होता.