महापुरुषांच्या विचारांसाठी बसपाच पर्याय

By Admin | Updated: January 16, 2015 01:00 IST2015-01-16T01:00:10+5:302015-01-16T01:00:10+5:30

या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून

BSP option for great personalities | महापुरुषांच्या विचारांसाठी बसपाच पर्याय

महापुरुषांच्या विचारांसाठी बसपाच पर्याय

जनकल्याणकारी दिवस : किशोर गजभिये यांचे प्रतिपादन
नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून विविध समाजाच्या महापुरुषांच्या विचारांना पुढे नेऊन या देशाचा विकास साधायचा असेल तर देशात केवळ बसपा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बसपाचे प्रदेश महासचिव किशोर गजभिये यांनी येथे केले.
बसपातर्फे गुरुवारी जन कल्याणकारी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, सचिव डॉ. रमेश जनबंधू, दादाराव ऊईके, उत्तम शेवडे, झेड. आर. दुधकुवर, राजीव बसवनाथे, दत्तराव धांडे प्रमुख अतिथी होते. नगरसेवक किशोर गजभिये, संजय जैस्वाल, मनिषा घोडेस्वार, ललिता पाटील, सत्यभामा लोखंडे, गौतम पाटील, दिलीप रंगारी आदी व्यासपीठावर होते. किशोर गजभिये म्हणाले, बसपा ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी राजकीय पार्टी आहे. त्यामुळे मायावती यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा सर्वांगीण विकास झाला.
मायावती यांनी पहिल्यांदाच सर्व समाजातील महापुरुषांना यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात भाजप हा सत्तेत आहे. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. अशा परिस्थितीत केवळ बसपाच भाजपला पर्याय आहे. तेव्हा महापुरुषांच्या विचारांनी हा देश चालवायचा असेल तर बसपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कृष्णा बेले यांनी उत्तर प्रदेशात बसपाच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कल्याणकारी कामाची माहिती दिली. उत्तर प्रदेशात ५० वर्षात जे झाले नव्हते. ते मायावती यांनी करून दाखविले. राज्याच्या विकासासोबतच त्यांनी महापुरुषांचे कार्यही जगासमोर आणण्याचे काम केले. त्यांचे स्मारक उभारून त्यांचा सन्मान केला. प्रास्ताविक विश्वास राऊत यांनी केले. संचालन प्रा. भाऊ गोंडाणे यांनी केले. तर राजकुमार बोरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: BSP option for great personalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.