शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बसपा-काँग्रेस आघाडीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:49 IST

आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती याच घेतील आणि त्या जे निर्णय घेतली तो आम्ही मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रभारी अशोक सिद्धार्थ : विविध जिल्ह्यातील ताकदीचा घेत आहोत अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती याच घेतील आणि त्या जे निर्णय घेतली तो आम्ही मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. चव्हाण यांच्या या आघाडीबाबतच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी डॉ. सिद्धार्थ यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात डॉ. सिद्धार्थ म्हणाले, खासदार चव्हाण यांनी आपली बाजू सांगितली आहे. परंतु आम्हीसुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून बसपा कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. बसपा कार्यकर्ते आघाडी करण्याची इच्छा ठेवत असतील तर त्यासंदर्भात वरिष्ठ नेतृत्वाला सांगितले जाईल. परंतु अंतिम निर्णय मात्र मायावती याच घेतील.यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते.मायावती यांच्यात मत परिवर्तित करण्याची ताकदबसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्यात मत परिवर्तित (व्होट ट्रान्सफर) करण्याची ताकद आहे. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूरच्या पोटनिवडणुकीत ते दिसून आले. कर्नाटकच्या सत्ता स्थापनेतही मायावती यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आम्ही राज्यात कुठे-कुठे मजबूत स्थितीत आहोत हे जाणून घेण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांचा दौरा करून पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेत असल्याचेही डॉ. सिद्धार्थ यांनी सांगितले.पक्ष संघटनेचा घेतला आढावादरम्यान नागपुरातील बसपाचे संघटन किती मजबूत आहे याबाबत गुरुवारी दुपारी उरुवेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बसपाचे महाराष्ट्र प्रभारी खा. अशोक सिद्धार्थ यांच्यासह प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी संघटनेचा आढावा घेत संघटना आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर