शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या महिला व मुलीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:36 PM2021-09-27T22:36:38+5:302021-09-27T22:37:19+5:30

Nagpur News कळमेश्वर- झुणकी रोडवरील शेतामध्ये एका महिलेचा गळा आवळून तर मुलीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

Brutal murder of a woman and a girl who came to work in agriculture; The accused absconded | शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या महिला व मुलीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या महिला व मुलीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

Next



नागपूर: कळमेश्वर- झुणकी रोडवरील शेतामध्ये एका महिलेचा गळा आवळून तर मुलीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत महिला आणि मुलीची ओ?ळख अद्यापही पटलेली नाही. याशिवाय हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

कळमेश्वर झुनकी रोडवर श्रावण घोडपागे रा.नागपूर यांचे शेत आहे. हे शेत त्यांनी कळमेश्वर येथील ललित गजानन गणोरकर यांना ठेका पद्धतीने दिले आहे. दोन-तीन दिवसापूर्वी ३० वर्षीय महिला आणि दहा वर्षीय मुलीसह एक इसम ललित गणोरकर यांना त्यांच्या शेतामध्ये काम मागण्यासाठी आला होता. यावर गणोरकर यांनी त्याला वर्षभर काम करणार असेल तर काम देतो असे सांगितले होते. यावर त्याने एक-दोन दिवस राहतो असे सांगत शेतातील झोपडीत आसरा मागितला.

सोमवारी दुपारी ललित गणोरकर हे शेतात आले असता झोपडीमध्ये त्यांना महिला आणि मुलगी मृतावस्थेत आढळून आली. त्यांच्यासोबत असलेला व्यक्ती शेतात दिसून आला नसल्याने गणोरकर यांनी लगेच कळमेश्वर पोलिसांनी यांना या घटनेची माहिती कळविली. लागलीच कळमेश्वर पोलीस येथे दाखल झाले. यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, ठाणेदार आसिफ रजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल पोहोचले.

पोलिसांनी घटनास्थळावर निरीक्षण केले असता दगड, पावशी आणि दोरी असे साहित्य आढळून आले. महिलेचा गळा आवळून तर मुलीला दगडाने ठेचून मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याचे माहिती पोलिसांनी दिली. हा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तसेच कळमेश्वर पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Brutal murder of a woman and a girl who came to work in agriculture; The accused absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.