जिजाजी, मी आत्महत्या करत आहे... ‘नेल आर्टिस्ट’ने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 22:28 IST2022-07-12T22:26:25+5:302022-07-12T22:28:49+5:30
Nagpur News उपराजधानीत मागील २४ तासांत दोन तरुणांनी गळफास घेऊन स्वत:चा जीव संपविल्याच्या घटना घडल्या.

जिजाजी, मी आत्महत्या करत आहे... ‘नेल आर्टिस्ट’ने घेतला गळफास
नागपूर : उपराजधानीत मागील २४ तासांत दोन तरुणांनी गळफास घेऊन स्वत:चा जीव संपविल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राजीव बिश्वास (२५, रामनगर) याने सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजीव हा मूळचा पश्चिम बंगालचा असून तो ‘नेल आर्टिस्ट’ होता. मागील काही दिवसांपासून तणावात होता. त्याच्या रूम पार्टनरसोबत तो रहायचा. रात्री तो आपल्या खोलीत गेला व त्याने जावयाला फोन करून मी जीव देत आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याच्या जावयाने त्याच्या रूम पार्टनरला फोन केला. दरवाजा बंद असल्याने शेजारच्या घरातून त्याच्या खोलीत प्रवेश केला असता त्याने गळफास घेतला होता. त्याला खाली उतरविले असता त्याचा श्वास थांबला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुसरी घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुकेश बुद्धसेन राऊत (२५, मनीषनगर) यांनी सिमेंट रस्त्याच्या बाजूला झाडावर दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आईने केलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.