भावानेच केली बहिणीकडे केली घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:45+5:302021-03-08T04:08:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बहिणीच्या घरातील साहित्य चोरून नेणाऱ्या एका आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली. चंद्रशेखर जानरावजी पोरकुटे ...

The brother did the burglary to his sister | भावानेच केली बहिणीकडे केली घरफोडी

भावानेच केली बहिणीकडे केली घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बहिणीच्या घरातील साहित्य चोरून नेणाऱ्या एका आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली. चंद्रशेखर जानरावजी पोरकुटे (४०) असे आरोपीचे नाव असून तो सुरभीनगरात राहतो.

३ मार्चला वाठोड्यातील एक महिला कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावी गेली होती. तिच्या दाराचे कुलूप तोडून घरातील सर्व साहित्य अज्ञात आरोपींनी चोरून नेले होते. पोलिसांनी त्यावेळी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात महिलेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर वाठोडा पोलिसांनी तपास सुरू केला. सदर महिला आणि तिच्या भावांत मालमत्तेवरून वाद असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पोरकुटेला ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने बहिणीच्या घरातील साहित्य चोरून नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरलेल्या साहित्यापैकी ९९ हजारांचे साहित्य जप्त केले. या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी पोरकुटेने आणखी कुणाची मदत घेतली. त्याचा पोलीस तपास करीत आहेत. ठाणेदार अनिल ताकसांडे, वरिष्ठ निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक रमेश नन्नावरे, सहायक निरीक्षक विजय नरबरिया, शिपायी चेतन पाटील, सुनील वानखेडे, देव सोनकुसरे, मिलिंद आणि आशिष बांते यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: The brother did the burglary to his sister