शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:54 IST

विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.

नागपूर - लंडनहून हैदराबादच्या दिशेने जाणारं ब्रिटिश एअरवेजचं विमाननागपूरविमानतळावर अचानक उतरवण्यात आले आहे. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी पहाटे नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटच्या सतर्कतेमुळे या विमानातील १६९ प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

माहितीनुसार, ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७ हे विमान लंडनहून हैदराबादला निघाले होते. त्याच वेळी विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटला आढळले. हैदराबाद येथील वातावरण खराब असल्याने तिथे लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने हे विमान नागपूरच्या दिशेने वळवले. त्याठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने परवानगी दिल्यानंतर हे विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. 

२४ तासांत चौथी घटना

मागील २४ तासांत विमानाशी निगडित ही चौथी घटना आहे.  झारखंड येथील चतरा येथे सोमवारी संध्याकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्स दुर्घटनेत डॉक्टर, रुग्णासह सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून रांचीहून रुग्णाला दिल्ली नेण्यात येत होते. रुग्णाच्या कुटुंबाने आधुनिक उपचारासाठी रुग्णाला दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एअर अ‍ॅम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून संध्याकाळी ७.१० वाजता त्यांनी उड्डाण घेतले. त्यानंतर ७.३४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. या विमानाचा शेवटचा संपर्क कोलकाता एअर कंट्रोलशी झाला होता. विमानाचा रडार संपर्क वाराणसीच्या दक्षिण पूर्वेकडील १०० एनएम अंतरावर तुटला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंटोलनुसार या विमानाने त्यांच्याशी संपर्क केला नव्हता. त्यानंतर चतरा येथील जंगलात हे विमान कोसळल्याचे समोर आले. 

मंगळवारी सकाळी अंदमानमध्ये पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणानंतर काही वेळातच ते समुद्रात कोसळल्याची घटना घडली. या विमानात किमान सात जण होते, त्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जात होते. उड्डाणानंतरच पायलटला तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली. त्यामुळे त्यांच्याकडे समुद्रात क्रॅश-लँडिंग करण्याचा पर्याय होता. या घटनेत प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दिल्लीतही एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. दिल्लीहून लेहच्या दिशेने झेपावलेल्या स्पाइसजेटच्या विमानात मंगळवारी सकाळी उड्डाणानंतर काही वेळातच मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. विमानाने हवेत झेप घेताच प्रवाशांना खिडकीबाहेर इंजिनमधून आगीच्या ज्वाळा आणि ठिणग्या दिसू लागल्या. या भयानक दृश्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान तातडीने पुन्हा दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळवले आणि सुरक्षित लँडिंग केले.

English
हिंदी सारांश
Web Title : British Airways flight emergency landing in Nagpur; 169 passengers safe.

Web Summary : A British Airways flight from London to Hyderabad made an emergency landing in Nagpur due to a technical fault. All 169 passengers are safe. This occurred amidst other aviation incidents, including an air ambulance crash in Jharkhand and a helicopter incident in Andaman.
टॅग्स :airplaneविमानnagpurनागपूर