शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘वर’ही शोधला आणि लग्नही केले थाटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:37 AM

राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला.

ठळक मुद्देशिवसेनेचा सामाजिक जिव्हाळा : गरीब कुटुंबाला दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारणातील सामाजिक जिव्हाळा हरवत चालला असताना नागपुरातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एका गरीब कुटुंबातील मुलीचा संसार थाटून दिला.मीनाक्षी ठाकरे असे मुलीचे नाव आहे. मीनाक्षीच्या वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिचा भाऊ सचिन याच्यावर आहे. पण सचिनचाही गेल्यावर्षी मृत्यू झाला. वडील आणि भावाच्या मृत्यूमुळे आई हर्षला हतबल झाली. मुलगी वयात आल्याने तिला लग्नाची चिंता भेडसावू लागली. लग्नासाठी पैसा नाही, त्यामुळे लग्न तरी कोण करणार, हा प्रश्न तिच्यापुढे ठाकला. या चिंतेने ग्रस्त असलेली मीनाक्षीची आई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्याकडे पोहोचली. त्यांच्यापुढे आपली परिस्थिती सांगितली. जिल्हा प्रमुख जाधव यांनी तिची आपबिती ऐकून ‘वर’ मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शरद ढोके याची निवड करण्यात आली. परंतु शरद याचीही आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती. त्यामुळे त्याच्या घरचे लग्न करण्यास तयार नव्हते. अशात शिवसेनेने दोन्ही परिवाराच्या लग्नाचा खर्च उचलला. १९ एप्रिलला पारडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात दोघांचे लग्न संपन्न झाले. मुलीच्या आईच्या आग्रहास्तव जाधव यांनी कन्यादान केले. पूर्व नागपूर विधानसभेचे संघटक यशवंत रहांगडाले यांनी सांगितले,अतिशय थाटात लग्न करण्यात आले. दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या लग्नकार्यात शहर प्रमुख राजेश तुमसरे, नगरसेवक किशोर कुमेरिया, डॉ. रामचरण दुबे, शहर समन्वयक नितीन तिवारी, मुन्ना तिवारी, अशोक धापोडकर, राजा रामदवार, सुनील बॅनर्जी, अक्षय मेश्राम, योगेश न्यायखोर, सचिन डाखोरे, बंटी धुर्वे, कृष्णा चावके, हासीम रजा शेख, अरुण तायवाडे आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर