शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कर्मचारी अडकला

By admin | Updated: September 18, 2014 00:45 IST

निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे.

एसीबीची कारवाई : सहसंचालक कार्यालयात खळबळ नागपूर : निवृत्त कर्मचाऱ्याचे अर्जित रजेचे बिल काढून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. पद्माकर तुकारामजी शेंडे असे आरोपीचे नाव आहे. प्रभाकर बिसनजी निंबार्ते (वय ६८) हे कामठीच्या सेठ पोरवाल महाविद्यालयात ग्रंथालय परिचर म्हणून सेवारत होते. ३१ आॅक्टोबर २००६ ला ते सेवानिवृत्त झाले. सहाव्या वेतन आयोगानुसार, १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २००६ या कालावधीतील त्यांची अर्जित रजेची रक्कम शिक्षण विभागाकडे थकीत होती. ती मिळण्यासाठी त्यांनी सहसंचालक, उच्च शिक्षण नागपूर विभाग यांच्याकडे अर्ज केला होता. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जुलै २०१४ मध्ये ते या कार्यालयात आले. तेथे त्यांना ग्रंथालय परिचर पद्माकर तुकारामजी शेंडे भेटले. एकाच महाविद्यालयात कार्यरत असल्यामुळे निंबार्ते यांनी शेंडेंकडे चौकशी केली असता आपण या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे शेंडेंनी सांगितले. ‘हे काम माझ्याकडेच असून, तुमचे अर्जित रजेचे २५ हजारांचे बिल वरिष्ठांकडे सादर करायचे असेल तर १० हजार रुपये लाच द्यावी लागेल‘, असे शेंडे म्हणाले. ओळखी असूनही आपल्या हक्काच्या रक्कमेपैकी शेंडे चक्क ४० टक्के रक्कम लाच म्हणून मागत असल्याचे पाहून निंबार्ते यांनी त्याला तडजोड करण्यासाठी विनवणी केली. मात्र, शेंडेंने १० हजार देत असाल तरच बिल वरिष्ठांकडे सादर करतो, असे सांगितले. एवढेच नव्हे तर, त्याच दिवशी ५ हजार रुपये मागितले. लाचेसाठी चटावलेल्या शेंडेंला धडा शिकवण्यासाठी निंबार्ते यांनी त्याची मागणी मान्य करून सरळ एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांनी तक्रार नोंदवताच पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचला ठरल्याप्रमाणे आज दुपारी २ वाजता निंबार्ते लाचेची रक्कम घेऊन शेंडेंकडे गेले. लाच स्वीकारताच कार्यालय परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने शेंडेंच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी) कार्यालयात खळबळकार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याचे लक्षात आल्यामुळे सहसंचालक कार्यालयात एकच खळबळ उडाली. काहींनी बाहेर धाव घेत जमलेल्या गर्दीतील अनेकांना ‘नंतर या‘ असा निरोप दिला. अधीक्षक प्रकाश जाधव, अतिरिक्त अधीक्षक वसंत शिरभाते, उपअधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कामगिरी बजावली.