शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अरुण माळी कारागृहात

By admin | Updated: June 12, 2014 01:24 IST

अडीच लाखांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवानी यांच्या न्यायालयाने आज आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना

मेडिकलमध्ये खळबळ : अतिदक्षता विभागात दिली जात होती ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’
नागपूर : अडीच लाखांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवानी यांच्या न्यायालयाने आज आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावून मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली.
शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मनोहर निमजे याला पोलीस निरीक्षक अरुण माळी यांच्यावतीने अडीच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. रविवारी या दोघांनाही पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडी रिमांडमध्ये असताना, माळी यांनी छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी मेडिकल कॉलेज इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले होते.
माळी यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’दिली जात असल्याच्या लोकमतच्या वृत्ताने खळबळ उडून बुधवारी माळी यांना इस्पितळातून सुटी देण्यात आली. लागलीच या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी माळी यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांची कारागृहाकडे रवानगी केली. माळी यांच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, न्यायालय आवारातील हल्ल्याच्या घटनेच्या वेळी माळी यांनी घातलेले कपडे एसीबीने ताब्यात घेतलेले आहे. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गरीब रुग्णांना अनेकवेळा केवळ औपचारिकता म्हणून दाखल केले जाते.
उपचारासाठी डॉक्टरांची गयावया करावी लागते, मात्र त्याचवेळी विशेष काहीही न झालेल्या लाचखोर अरुण माळीला अतिदक्षता विभागाच्या वातानुकूलित खोलीत ठेवण्यात आले होते.
माळी आपल्याला मधुमेह असल्याचे सांगत असताना, तो घेत असलेल्या औषधाचे त्याला नाव माहीत नव्हते, हे विशेष. औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचा अंतर्गत वॉर्ड क्र . २४ हा अतिदक्षता विभाग येतो. मेडिकलमधील हा विभाग सर्वात व्यस्त आहे. (प्रतिनिधी)