शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

कोरोनामुळे राज्यात ब्रीथ अ‍ॅनलायझरवर लाल फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:51 AM

ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर पोलिसांनी करू नये, असे आदेश डीजी (पोलीस महासंचालक) कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पोलिसांना हे आदेश मिळाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाने थांबवला ‘ड्रंक न ड्राईव्ह’

डीजी ऑफिसची अधिसूचना :नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोनाला अंकुश घालण्यासाठी राज्य पोलीस दल सरसावले आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी रात्रीपासून राज्यात डीडी(ड्रंक न ड्राईव्ह)ची कारवाई केली जाऊ नये, अर्थात ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर पोलिसांनी करू नये, असे आदेश डीजी (पोलीस महासंचालक) कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पोलिसांना हे आदेश मिळाले आहेत.कोरोनाला साथरोग घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. शासन आणि प्रशासन त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहेत. सरकारी यंत्रणांनी शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली आहे. मॉल, जीम, जलतरण तलाव, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश जारी झाले आहे. तर पोलिसांनी जेथे नागरिकांची गर्दी होईल, असे कोणतेच कार्यक्रम करू नका, असे आदेश काढले आहेत. गर्दी झाली की कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव एकाचा दुसऱ्या आणि दुसऱ्याचा तिसऱ्याला होऊ शकतो अन् कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू शकते, हा धोका लक्षात घेऊनच हे उपाय करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांना आणि अशा दारूड्या वाहनचालकांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांना होऊ शकतो. वाहतूक शाखेचा पोलीस एकाच ब्रीथ अ‍ॅनलायझरमधून दिवसभरात अनेकांची तपासणी करतो. एकाच्या तोंडात घातलेले उपकरण पोलीस दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या अन् अनेकांच्या तोंडात घालतो. स्वत:जवळही ते उपकरण बाळगतो. त्यामुळे कोरोनाचा विषाणू ड्रंक न ड्राईव्हच्या माध्यमातून अनेकांना कवेत घेऊ शकतो. हा धोका ध्यानात आल्यामुळेच डीजी आॅफिसमधून सोमवारी सायंकाळी एक अधिसूचना जारी करण्यात आली. राज्यातील सर्व ठिकाणच्या पोलीस प्रमुखांना ती अधिसूचना पाठवून डीडीची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पाहिजे तर मेडिकल करायासंबंधाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याकडे लोकमतने संपर्क केला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डीडीच्या कारवाईसाठी ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर करू नका, असे स्पष्ट आदेश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र, आवश्यकच असेल तर संबंधित वाहनचालकांचे पोलीस मेडिकल करू शकतात, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह