निजामुद्दीन हैदराबाद स्पेशलचा ब्रेक जाम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST2021-07-05T04:06:49+5:302021-07-05T04:06:49+5:30

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीच्या एसी कोचचा ब्रेक दुपारी अचानक जाम झाला. यामुळे धूर निघाल्यामुळे रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. ...

Break Jam of Nizamuddin Hyderabad Special () | निजामुद्दीन हैदराबाद स्पेशलचा ब्रेक जाम ()

निजामुद्दीन हैदराबाद स्पेशलचा ब्रेक जाम ()

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीच्या एसी कोचचा ब्रेक दुपारी अचानक जाम झाला. यामुळे धूर निघाल्यामुळे रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. गाडीच्या गार्डने तत्परता दाखवून जाम झालेल्या ब्रेकची समस्या दूर केली. त्यानंतर ही गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीनकडून हैदराबादला जात असलेली ०२७२२ निजामुद्दीन-हैदराबाद विशेष रेल्वेगाडी रविवारी दुपारी ४ वाजता सोनखांब येथून नागपूरकडे येत होती. अचानक या गाडीच्या बी ४ कोचच्या खालून धूर निघू लागला. गाडीच्या गार्डला त्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने लोकोपायलटला रेल्वेगाडी थांबविण्यास सांगितले. पाहणी केल्यानंतर ब्रेक जाम झाल्याचे समजले. गार्डने लागलीच उपकरणांच्या मदतीने ही समस्या दूर केली. त्यानंतर ही गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर या गाडीच्या ब्रेकची पुन्हा तपासणी करण्यात आली. परंतु काहीच त्रुटी न आढळल्यामुळे सायंकाळी ५.२५ वाजता ही गाडी हैदराबादसाठी रवाना करण्यात आली.

..............

Web Title: Break Jam of Nizamuddin Hyderabad Special ()