जरीपटक्यात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST2020-11-22T09:28:44+5:302020-11-22T09:28:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जरीपटक्यातील एका ८० वर्षाच्या वृद्धेच्या घरी धाडसी चोरी झाली. चोरट्याने अडीच लाखाची रोकड तसेच ...

Brave theft in Jaripatak | जरीपटक्यात धाडसी चोरी

जरीपटक्यात धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जरीपटक्यातील एका ८० वर्षाच्या वृद्धेच्या घरी धाडसी चोरी झाली. चोरट्याने अडीच लाखाची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सात लाखाचा ऐवज लंपास केला. ही चोरी केअरटेकर महिलेने केली असावी, असा संशय आहे.

सुनील इंद्रकुमार केवलरामानी हे जरीपटक्यातील सिंधूनगर सोसायटीत राहतात. त्यांची ८० वर्षीय आत्या कमला सुंदरलाल वासवानी एकता अपार्टमेंटमध्ये एकटीच राहते. तिची काळजी घेण्यासाठी केवलरमानी यांनी पूजा मेश्राम नामक महिलेला कामावर ठेवले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ती कामावर येत नसल्याने वृद्ध वासवानी यांची गैरसोय होऊ लागली. दरम्यान, त्यांना पैशाचे काम पडल्यामुळे त्यांनी आपल्या फ्लॅटमधील कपाट उघडून बघितले असता त्यात ठेवलेली अडीच लाखांची रोकड तसेच सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. २ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय असून, अचानक कामावर येणे बंद केल्याने ही चोरी पूजा मेश्रामने केली असावी असाही संशय आहे. केवलरामानी यांनी शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तसे नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी मेश्राम हिची चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Brave theft in Jaripatak