शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने घेतली प्रेयसीच्या सरणावर उडी; नैराश्यामध्ये प्रेयसीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST

Nagpur : कन्हान नदीच्या शांतीघाटावरील थरार

लोकमत न्यूज नेटवर्ककामठी/कन्हान : निराश प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पार्थिवावर कामठी शहरालगतच्या कन्हान नदीतील शांतीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पार्थिव जळत असताना प्रियकराने दारूच्या नशेत सरणावर उडी मारत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला लगेच पकडले आणि चांगला चोप दिला. यात तो जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

अंशिका नितीन खोब्रागडे (१९, रा. हनुमाननगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे मृत प्रेयसीचे तर अनुराग राजेंद्र मेश्राम (२७, रा. हनुमाननगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दोघेही एकाच भागात राहणारे असल्याने त्यांची आपसात ओळख होती. पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या प्रेमसंबंधात झाले. कुठल्या तरी कारणाने तिला नैराश्य आले आणि तिने रविवारी (दि. ८) सायंकाळी घरातील खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लाऊन घेतला.

कुटुंबीयांनी तिला खाली उतरवून लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पार्थिव पोस्टमार्टमसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

कारवाई करण्याची मागणीसहायक पोलिस उपायुक्त विशाल शिरसागर व कामठी (नवीन) चे ठाणेदार महेश आंधळे यांनी जखमी अनुराग व घटनास्थळाची पाहणी केली. त्याला अंशिकाच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप वडील राजेंद्र मेश्राम यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनुराग शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेदार महेश आंधळे यांनी दिली.

कुटुंबीयांनी नेले हॉस्पिटलमध्येया मारहाणीत अनुराग मेश्राम नदीच्या पात्रात बेशुद्ध पडला होता. या प्रकाराची माहिती नागरिकांनी त्याच्या वडिलांना दिली. वडील राजेंद्र व भाऊ पवन यांनी कन्हान पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत तो तिथेच पडून होता. त्यांनी अनुरागला कामठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तो दारू प्यायला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूkamthi-acकामठीnagpurनागपूर