आईने चाबी न दिल्याने मुलाने जाळली बाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 21:32 IST2021-12-14T21:31:59+5:302021-12-14T21:32:28+5:30
Nagpur News दारूच्या नशेत असलेल्या मुलाला आईने बाइकची चाबी न दिल्यामुळे मुलाने बाइकला आग लावून दिली.

आईने चाबी न दिल्याने मुलाने जाळली बाईक
नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या मुलाला आईने बाइकची चाबी न दिल्यामुळे मुलाने बाइकला आग लावून दिली. ही घटना हुडकेश्वर येथील संजय गांधी नगर झोपडपट्टीतील आहे.
५० वर्षीय शारदा चौधरी या मजुरी करतात. शारदा यांच्या कुटुंबात पती व दोन मुले आहेत. सर्वच दारुडे आहेत. शारदा यांनी मुलांसाठी दुचाकी खरेदी करून दिली. सोमवारी सकाळी शारदाचा मुलगा राकेश चौधरी हा गाडी घेऊन दारू पिण्यासाठी गेला. त्याने घरी येऊन चाबी ठेवून दिली. दुपारी पुन्हा ४ वाजता गाडी घेऊन त्याला बाहेर जायचे होते. गाडीवरून त्याने भावाशी वाद घेतला. या वादात आई शारदाने चाबी हिसकावून स्वत:जवळ ठेवली. राकेशने शारदाकडे चाबी मागितली; परंतु तिने चाबी देण्यास नकार दिला. त्यामुळे राकेश संतप्त झाला. त्याने गाडीला आग लावली. शारदा यांनी याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी राकेशला अटक केली.