डोक्यावर फोडली दारूची बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST2021-08-25T04:12:23+5:302021-08-25T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भाड्याच्या पैशाचा वाद झाल्यानंतर प्रवाशाने दारूची बाटली ऑटो चालकाच्या डोक्यावर फोडली. त्यामुळे उमेश मुकुंदा ...

A bottle of liquor smashed on the head | डोक्यावर फोडली दारूची बाटली

डोक्यावर फोडली दारूची बाटली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भाड्याच्या पैशाचा वाद झाल्यानंतर प्रवाशाने दारूची बाटली ऑटो चालकाच्या डोक्यावर फोडली. त्यामुळे उमेश मुकुंदा ढाकळे (वय ३१) नामक ऑटोचालक जबर जखमी झाला. बाबूळखेडा मानवता शाळेजवळ सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

ढाकळेच्या तक्रारीनुसार, बेलतरोडी टी पॉईंट जवळून त्याच्या ऑटोत रत्नदीप कार्तिक कस्तुरे (वय २९, रा. बेलतरोडी) हा बसला. नियोजित ठिकाणी उतरल्यानंतर भाड्याच्या पैशावरून ढाकळे आणि कस्तुरेत वाद झाला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर आरोपी कस्तुरेने जवळची काचेची बाटली काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारली आणि त्याला जबर दुखापत केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. जखमी ढाकळेने बेलतरोडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: A bottle of liquor smashed on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.