मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यासह दोघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 20:46 IST2020-07-30T20:45:18+5:302020-07-30T20:46:42+5:30
महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सीताबर्डी आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या घटना घडल्या.

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यासह दोघांनी लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सीताबर्डी आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या घटना घडल्या. धरमपेठ मधील आंबेडकर नगरात राहणारे रजनीश राजेश गौरे (वय ३७) यांनी बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच सीताबर्डीचा पोलीस ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी गौरे यांचा मृतदेह मेडिकलला पाठविला. रजनीश गौरे हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
अशाच प्रकारे यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिपू सुलतान चौकाजवळ राहणाºया आसमाबी मोहम्मद जाबीर अन्सारी (वय ५५) या महिलेने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आसमाबी यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. यासंबंधाने चौकशी सुरू असल्याची माहिती यशोधरा नगर पोलिसांनी सांगितली.