नागपुरात अजनी पोलिसांनी पकडले बुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:10 IST2018-12-15T20:09:35+5:302018-12-15T20:10:52+5:30
हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली.

नागपुरात अजनी पोलिसांनी पकडले बुकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली. जितेश ऊर्फ जितू भूपेंद्र परमार (वय ३८, रा. सोमवारी क्वॉर्टर) आणि संतोष मदन सूर्यवंशी (वय ३७, रा. चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत.
शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश या संघामध्ये क्र्रिकेटचा आंतरराष्टीय सामना सुरू होता. हनुमाननगरातील साई कलेक्शन नामक दुकानात बसून काही जण या सामन्यावर क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याची माहिती एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने ही माहिती अजनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच तेथे छापा घालून परमार आणि सूर्यवंशीला क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख १५,३०० रुपये, टीव्ही, मोबाईल आणि अन्य साहित्यासह ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांना पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.