शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड कॅन्सरवर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट प्रभावी उपचार पद्धत

By admin | Updated: May 31, 2016 02:42 IST

‘ल्युकेमिया’, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र

नागपूर : ‘ल्युकेमिया’, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र रक्ताच्या कर्करोगाचा थोडा संबंध किरणोत्सर्जन (अणुंपासून निघालेल्या किरणाचा वापर) काही प्रकारचे रसायन व काही औषधे यांच्याशी आहे. पण बऱ्याच रुग्णांमध्ये असे कोणतेही कारण दिसून येत नाही. याचा एक प्रकार ‘अ‍ॅक्युट लिम्पोब्लास्टिक ल्युकेमिया’ (एएलएल) आहे. जो विशेषकरून लहान मुलांना होतो. ‘अ‍ॅक्युट मेलॉईड ल्युकेमिया’ (एएमएल) हा दुसऱ्या प्रकारचा रक्ताचा कर्करोग उशिरा वयात येतो. या रोगावर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ ही प्रभावी उपचार पद्धत आहे, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटल्सचे हिमॅटोलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट विभागाचे प्रमुख डॉ. सचिन जाधव यांनी दिली.‘लोकमत’ला दिलेल्या शुभेच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, अस्थीतील मज्जापोकळी भरतो तो पदार्थ म्हणजे ‘बोनमॅरो’ यात कर्करोगाच्या पेशी शिरल्यास रक्ताचा कर्करोग होतो म्हणूनच याला ‘बोनमॅरो कॅन्सर’ असेही म्हटल्या जाते. अस्थीच्या याच मज्जापोकळीत रक्त तयार होते. या रक्तात ‘रेड सेल’, ‘व्हाईट सेल’ आणि ‘प्लेटलेट’ असतात. येथे कॅन्सरच्या पेशींचा शिरकाव झाल्यास हे तिन्ही रक्त घटक कमी व्हायला लागतात. ‘रेड सेल’ कमी झाल्याने हिमोग्लोबिन कमी होते. यामुळे थकवा निर्माण होतो. ‘व्हाईट सेल’ कमी झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संक्रमण (इन्फेक्शन) होते. सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनिया हे आजार होतात. परंतु ‘ल्युकेमिया’च्या रुग्णांमध्ये हे आजार लवकर बरे होत नाही. शरीरातील आतील आणि बाहेरचे जंतू ‘अटॅक’ करीत असल्याने रुग्णाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. ‘प्लेटलेट’ कमी झाल्याने रक्तस्राव होतो. नाक, हिरड्या, लघवीतून रक्त येते. महिलांना अचानक मासिकपाळीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वस्थ असलेला व्यक्ती या आजारामुळे अचानक गंभीर होतो. रक्ताच्या कर्करोगाचा रुग्ण सकाळी स्वस्थ आणि सायंकाळी आयसीसीयूमध्येही असू शकतो. इतक्या झपाट्याने त्याच्या शरीरात बदल होतात.(प्रतिनिधी)‘ल्युकेमिया’च्या वेगवेगळ्या प्रकारात ९० टक्के रुग्ण बरे होतातकाही डॉक्टरांना या रोगाचे विशेष ज्ञान नसल्याने रुग्णांना सर्रास अ‍ॅन्टीबायोटिक औषधे देतात. यामुळे रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर होते. अनेक वेळा रुग्णांना आवश्यक औषधोपचार मिळत नसल्याने त्यांची स्थिती केमोथेरपी घेण्याचीही राहत नाही. ल्युकेमियाचे तत्काळ निदान झाल्यास, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारातील ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात.असे होते ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ हा जुना शब्द झाला आहे. आता स्टेमसेल ट्रान्सप्लान्ट म्हटले जाते. शरीरात बोनमॅरो स्टेमसेलला ‘हिमॅटोपायोटिक’ स्टेमसेलही म्हटले जाते. हे स्टेमसेल निरोगी व्यक्तीच्या रक्तामधून वेगळे करून रुग्णांना दिले जाते. या स्टेमसेलमुळेच रेडसेल, व्हाईटसेल व प्लेटलेट नव्याने तयार होतात. ट्रान्सप्लान्टपूर्वी हायडोज केमोथेरपी दिली जाते. ही थेरपी हाडाच्या आतील कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास मदत करते. काही रुग्णांना रेडिएशनसुद्धा दिले जाते. ट्रान्सप्लान्टचा सक्सेस रेट रुग्णाच्या आरोग्यावर अवलंबून असतो. परंतु सरारसरी ६० ते ७० टक्के याचा सक्सेस रेट आहे.आरोग्य विमा असणे आवश्यक आहेबदलत्या जीवनशैलीचा निश्चितच आरोग्यावर प्रभाव पडत आहे. औषधे व इस्पितळाचा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असणे आवश्यक झाले आहे. याचा फायदा कठीणसमयी नक्कीच होतो, असेही डॉ. जाधव म्हणाले.