शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:44 IST

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाचे नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेने या विमानाचे लँडिंग करुन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले असून विमानाची तपासणी सुरू केली आहे. 

...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात

विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, निर्धारित प्रोटोकॉलनुसार तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, यामध्ये धमकी गंभीर असल्याचे निश्चित करण्यात आले कारण त्यात फ्लाइट नंबर देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता. तोपर्यंत फ्लाइट कोचीहून उड्डाण करत होती, ती सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विमानतळावर वळवण्यात आली होती. सध्या विमान आणि प्रवाशांची चौकशी सुरू आहे.

याआधी दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी थायलंडमधील फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन प्रक्रियेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाच्या विमानात १५६ प्रवासी होते, असे निवेदनात म्हटले आहे.

मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी

गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाने १३ जून रोजी सकाळी मुंबईहू लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले. त्यानतंर उलटसुलट चर्चांना उधाण आले. याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. 

एअर इंडियाने एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय १२९ विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे."

टॅग्स :Indigoइंडिगोnagpurनागपूरairplaneविमान