नागपूर बस स्थानकात आढळला बॉम्बसदृश बॉक्स, शहरात खळबळ
By योगेश पांडे | Updated: February 7, 2024 15:49 IST2024-02-07T15:47:34+5:302024-02-07T15:49:17+5:30
पोलिसांनी सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉक्स नेला आहे.

नागपूर बस स्थानकात आढळला बॉम्बसदृश बॉक्स, शहरात खळबळ
नागपूर : नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉक्स नेला आहे.
एमएच ४० वाय ५०९७ ही बस गडचिरोली आगाराची आहे. १ फेब्रुवारी रोजी ती नागपुरात आली होती. त्यानंतर ती मंगळवारी सावनेरलादेखील गेली होती. बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आगारात आली. तेव्हा तंत्रज्ञाला संशयास्पद बॉक्स दिसला. त्याने तातडीने कंट्रोल रूमला याची माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे पथक आगारात दाखल झाले.
टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्बमध्ये असणारे काही घटक असल्याची शंका आली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली.