शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बोगस आयडीने ई-तिकिटांचा गोरखधंदा उजेडात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:35 AM

उन्हाळ्यात रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत बोगस आयडीच्या (ओळख पत्र) आधारे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ई-तिकिट देण्याचा गोरखधंदा शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने उजेडात आणला.

ठळक मुद्दे मुंबईनंतर नागपुरात बोगस आयडी : ३२ लाईव्ह ई-तिकीट, आयपीएफची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळ्यात रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत बोगस आयडीच्या (ओळख पत्र) आधारे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ई-तिकिट देण्याचा गोरखधंदा शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने उजेडात आणला. यापूर्वी मुंबईत अशाच प्रकारच्या कारवाईत दीड कोटी रुपयांची ई-तिकीट जप्त केली होती, हे उल्लेखनीय.ही कारवाई शुक्रवारी सकाळी मेयो हॉस्पिटल चौकात सदोदय कॉम्प्लेक्समधील शोभना ट्रॅव्हल्समध्ये करण्यात आली. आयपीएफने सी-५, पार्क व्ह्यू अपार्टमेंट किंग्जवे येथील रहिवासी आरोपी मनीष राजेंद्र प्रसाद भार्गव (५०) याला अटक केली. सोबत त्याच्याकडून ६८ प्रवाशांकरिता तयार केलेली ९२ हजार २३९ रुपये मूल्याची ३२ लाईव्ह ई-तिकिटे आणि तीन संगणक, एक लॅपटॉप, दोन मोबाईल, तीन इंटरनेट डोंगल, एक वायरलेस राऊटर व दोन पेन ड्राईव्ह जप्त केले.या कारवाईची माहिती देताना आरपीएफ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा यांनी सांगितले की, आरपीएफला ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त मिळाली होती. या आधारावर शुक्रवारी सकाळी आरपीएफच्या (डीएससी आॅफिस) चमूने गणेशपेठ पोलिसांसोबत मेयो चौकातील सदोदय कॉम्प्लेक्समधील शोभना ट्रॅव्हल्सवर धाड टाकली. अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये निरीक्षक ए.सी. सिन्हा, उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होतीलाल मीना, राजेश औतकर, प्रधान आरक्षक राकेश करवाडे, जगदीश सोनी, आरक्षक अश्विन पवार, अमित बारापात्रे आणि विवेक कनोजिया यांना मनीष भार्गव बोगस आयडीने ई-तिकिट तयार करताना सापडला.कुटुंबीय करतात सहकार्यआरोपी मनीष भार्गव याचे कुटुंबीय तिकिटांच्या अवैध व्यवहारात सहकार्य करीत असल्याची माहिती आहे. या अवैध व्यवहारातून त्याने आलिशान घर बनविले आहे. आरोपीची पत्नी या कामात लिप्त असल्याची माहिती आहे. ती सरकारी कार्यालयात नोकरी करीत आहे.आरोपीवर २०१५ मध्ये गुन्ह्याची नोंदआरोपी मनीष भार्गवने गुन्हा कबूल करताना सांगितले की, यापूर्वी माझ्या विरोधात नागपुरातील आरपीएफ ठाण्यात वर्ष २०१५ मध्ये रेल्वे आरक्षणाचा काळाबाजार करण्यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.काय जप्त केलेशोभना ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून आरपीएफ दलाने आरोपी मनीष भार्गव याला अटक करून ६८ प्रवाशांसाठी तयार केलेली ९२ हजार २३९ रुपये मूल्याची ३२ लाईव्ह तिकिटे आणि तीन संगणक, एक लॅपटॉप, दोन मोबाईल, ३ इंटरनेट डोंगल, एक वायरलेस राऊटर व दोन पेन ड्राईव्ह जप्त केले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरticketतिकिट