तरुणाची हत्या करून मृतदेह डम्पिंग यार्डमध्ये फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:27 IST2019-03-28T00:26:54+5:302019-03-28T00:27:37+5:30
एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह आरोपींनी भांडेवाडीच्या डंम्पिंग यार्डमधील घाणपाण्यात टाकून दिला. २४ मार्चच्या रात्री ८ वाजतापूर्वी हा प्रकार घडला असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाची हत्या करून मृतदेह डम्पिंग यार्डमध्ये फेकला
ठळक मुद्देनागपूरच्या भांडेवाडी येथील घटना : मृत तरुण अनोळखी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह आरोपींनी भांडेवाडीच्या डंम्पिंग यार्डमधील घाणपाण्यात टाकून दिला. २४ मार्चच्या रात्री ८ वाजतापूर्वी हा प्रकार घडला असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुण २० ते ३० वयोगटातील असून, त्याची ओळख पटलेली नाही. मृत तरुण कोण, त्याची हत्या कुणी आणि का केली, त्याची चौकशी नंदनवन पोलीस करीत आहेत.