पंचशील चाैकाजवळ मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:43+5:302021-02-13T04:10:43+5:30
--- पेंटरचा आकस्मिक मृ्त्यू नागपूर : कृष्णधाम मानकापूर येथील रहिवासी अमलेश चरणदास मेश्राम (वय ४०) या पेंटरचा बेलतरोडीतील पृथ्वीधाम ...

पंचशील चाैकाजवळ मृतदेह आढळला
---
पेंटरचा आकस्मिक मृ्त्यू
नागपूर : कृष्णधाम मानकापूर येथील रहिवासी अमलेश चरणदास मेश्राम (वय ४०) या पेंटरचा बेलतरोडीतील पृथ्वीधाम नगरात आकस्मिक मृत्यू झाला. देशमुख यांच्या घरी मेश्राम पेंटिंगचे काम करीत असताना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना उपचारासाठी नेले असता हॉस्पिटलसमोरच मेश्राम यांनी जीव सोडला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय आहे. ज्ञानेश्वर देवराव गेडाम (५२) यांनी दिलेल्या माहितीवरून बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
मानेवाड्यातील व्यक्तीचा अचानक मृत्यू
नागपूर : मानेवाड्यातील व्यंकटेश नगरात राहणारे प्रकाश भीमराव तायडे (वय ४९) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ते मानेवाडा घाटासमोरच्या ओट्यावर बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---