अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:25+5:302021-04-30T04:10:25+5:30
बुटीबाेरी : रेल्वे रुळालगत एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी रेल्वे फाटक ...

अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
बुटीबाेरी : रेल्वे रुळालगत एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी रेल्वे फाटक परिसरात मंगळवारी (दि. २७) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रेल्वेचे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना, बाेरखेडी रेल्वे फाटक परिसरात एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच बुटीबाेरी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सदर मृत व्यक्ती अंदाजे २५ ते ३० वयाेगटातील असून, मध्यम बांधा, उंची ५ फूट ७ इंच, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट व ग्रे रंगाचा पॅन्ट परिधान केला आहे. मृताच्या उजव्या हातावर रूपेश व दिल कृतीमध्ये इंग्रजीत ‘आर’ अक्षर गाेंदलेले आहे. याप्रकरणी रेल्वे प्रबंधक राजेंद्र शेषराव गुडधे (५३) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.