अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:51+5:302021-04-05T04:08:51+5:30

बुटीबाेरी : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी फाटक परिसरातील रेल्वे रूळावर एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी ...

The body of an unknown person was found | अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

बुटीबाेरी : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी फाटक परिसरातील रेल्वे रूळावर एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी (दि.४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रेल्वे कर्मचारी एफ फ्रान्सिस ॲन्थाेनी हे रविवारी सकाळच्या सुमारास रेल्वे पटरीची पाहणी करीत असताना बाेरखेडी फाटक परिसरात रेल्वे रूळावर अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत बुटीबाेरी पाेलिसांना सूचना देण्यात आली. लगेच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाेगटातील असून, उंची ५ फूट ५ इंच, सडपातळ बांधा, उजव्या हातात धातूचे कडे व अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट, सिमेंट रंगाचा बरमुडा परिधान केला आहे. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: The body of an unknown person was found