बेपत्ता व्यक्तीचा नांदाेरा शिवारात मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:48+5:302021-01-13T04:20:48+5:30
काेंढाळी : दाेन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नांदाेरा शिवारात आढळून आला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. लाेकेश ...

बेपत्ता व्यक्तीचा नांदाेरा शिवारात मृतदेह आढळला
काेंढाळी : दाेन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नांदाेरा शिवारात आढळून आला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.
लाेकेश पांडुरंग चव्हाण (३९, रा. श्रीकृष्णनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. रविवारी (दि.१०) लाेकेश हा रीतेश साहेबराव माेरे व त्याचा एक मित्र हे तिघेही कारने चांदूर बाजार नजीकच्या काेहळा येथे रीतेशच्या बहिणीकडे गेले हाेते. त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता ते सर्व नागपूरला परत येण्यासाठी कारने निघाले हाेते. त्यांच्यासाेबत रीतेशचा १० वर्षीय भाचाही साेबत हाेता.
दरम्यान, पहाटे ३ वाजताच्या सुमारास काेंढाळीनजीकच्या खालसा ढाबा परिसरात कारमधील पेट्राेल संपले. यामुळे रीतेश, त्याचा मित्र व रीतेशचा भाचा हे कारजवळ थांबले, तर लाेकेश हा एका अनाेळखी व्यक्तीच्या दुचाकीने काेंढाळीकडे पेट्राेल घेण्यासाठी गेला हाेता. परंतु, ताे परत न आल्याने साेमवारी (दि.११) सकाळी ११ वाजता काेंढाळी पाेलीस ठाण्यात लाेकेशच्या बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार काेंढाळी पाेलिसांनी लाेकेशचा शाेध सुरू केला. मात्र, ताे कुठेही आढळला नाही.
नांदाेरा शिवारातील नरेश राऊत यांच्या शेतात बेपत्ता लाेकेशचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. शेतकऱ्यांनी पाेलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लाेकेश हा सकाळपासून सायंकाळपर्यंत दारू पिऊन घटनास्थळानजीक बसला हाेता. परंतु, रात्री त्याचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट झाले नाही. शिवाय, मृताच्या शरीरावर कुठेही जखमा नाही. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार विश्वास पुल्लरवार तपास करीत आहेत.