शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

नागपुरात दाम्पत्याच्या बॅगमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह, सतर्क रिक्षाचालकामुळे गुन्हा झाला उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:21 IST

तरुण-तरुणीच्या बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील माटे चौकातील ही घटना आहे.

नागपूर : एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर सुटकेस फेकून देण्यासाठी एक जोडपे रेल्वे स्थानकाकडे निघाले. मात्र, ऑटोचालकाला संशय आल्यामुळे आरोपी जोडपे पळून गेले आणि पोलिसांना या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळाली.  प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

ऑटोचालक विनोद सावंत सोनडवले (वय ४५, रा. विजयनगर) सोमवारी (16 ऑक्टोबर) पहाटे 2.40 वाजता प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिराजवळ होते. यालेळी त्यांना भली मोठी सुटकेस घेऊन आलेल्या एका दाम्पत्याने रेल्वे स्थानकावर जायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार, या दोघांना घेऊन सोनडवले रेल्वेस्थानकाकडे निघाले. सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लघुशंकेचा बहाणा करून माटे चौकाजवळ ऑटो थांबवली. ते बाजूला जाऊन फोनवर बोलत असल्याचे पाहून ऑटोतील दाम्पत्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी ऑटोतून पळ काढला. ऑटोचालक सोनडवलेने सरळ प्रतापनगर पोलिसांना सुटकेस दाखवली. ती उघडून बघितली असता त्यात एकाचा मृतदेह आढळला. आरोपी दाम्पत्य सुटकेसमधील मृतदेह रेल्वेतून फेकून पुरावा नष्ट करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. 

मृताची ओळख पटलीप्रतापनगरचे ठाणेदार शिवाजीराव गायकवाड, एपीआय सचिन शिर्के आणि त्यांच्या सहका-यांनी चौकशीची सूत्रे फिरवली. त्यानंतर मृत व्यक्ती मानसिंग कुंवरसिंग शिव (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले. मानसिंगचा खून कुणी केला त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यानंतर घरगुती वादातून मानसिंगची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर तो रेल्वेतून फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई रेल्वेस्थानकाकडे निघाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मानसिंग यांच्या पत्नीला अटक करण्यात आली असून आरोपी जावई फरार आहे. या दोन्ही आरोपींनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी एका दुकानातून बॅग विकत घेतली होती. त्याचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून दोन्ही आरोपी बॅग विकत घेत असल्याचे यात दिसत आहे.

टॅग्स :crimeगुन्हेnagpurनागपूरMurderखून