शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची ‘अपग्रेड सिस्टीम’ ठरतेय प्रवाशांसाठी वरदान

By admin | Updated: April 25, 2015 02:16 IST

वेटिंग असलेले तिकीट प्रवासाच्या तारखेपर्यंत ‘कन्फर्म’ न झाल्यास ते रद्द करण्याची पाळी येते.

दयानंद पाईकराव नागपूरवेटिंग असलेले तिकीट प्रवासाच्या तारखेपर्यंत ‘कन्फर्म’ न झाल्यास ते रद्द करण्याची पाळी येते. परंतु रेल्वेची ‘अपग्रेड सिस्टीम’ प्रवाशांसाठी फायद्याची ठरत असून, १ ते १० एप्रिल २०१५ या कालावधीत ४,५५० प्रवासी अपग्रेड होऊन त्यांना वरच्या क्लासमध्ये बर्थ मिळून त्यासाठी वेगळी रक्कम मोजण्याची गरज पडली नाही. त्यामुळे अपग्रेड सिस्टीम रेल्वे प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे.रेल्वे प्रशासनाच्या ‘अपग्रेड सिस्टीम’मध्ये एखाद्या प्रवाशाने खरेदी केलेले स्लिपर क्लासचे तिकीट वेटिंग असल्यास आणि थर्ड एसीमध्ये बर्थ रिकामा असल्यास त्या प्रवाशाला थर्ड एसीच्या डब्यात बर्थ मिळून त्यासाठी वेगळी रक्कम लागत नाही. एसी थ्री टायरच्या प्रवाशाचे रिझर्व्हेशन वेटिंग असेल आणि एसी टू टायरमध्ये बर्थ रिकामा असेल तर त्या प्रवाशास एसी टू टायरमध्ये बर्थ मिळतो. यात प्रवासी अणि रेल्वे प्रशासन दोघांचाही फायदा आहे. एसी कोचमध्ये बर्थ रिकामा असल्यास रेल्वेचे नुकसान होते. जर स्लिपर क्लास प्रवाशाने वेटिंग असल्यामुळे तिकीट रद्द केले तर हे नुकसान आणखी वाढते. त्यामुळे अपग्रेड सिस्टीममध्ये प्रवाशाचा फायदा होऊन रेल्वेच्या महसुलात वाढ होते. १ ते १० एप्रिल या काळात मध्य रेल्वेत एकूण ४,५५० प्रवासी अपग्रेड झाले. त्यामुळे मध्य रेल्वेला एकूण १५ लाख २५ हजार ८७४ रुपयांचा महसूल मिळाला. यात ७३४ प्रवासी वेटिंगच्या यादीतून आरएसीमध्ये गेले. १३३६ प्रवाशांचे वेटिंग कन्फर्म झाले, तर ३,०३९ प्रवासी आरएसीमधून कन्फर्म झाले. अपग्रेड झालेल्या प्रवाशांना त्याबाबतची माहिती संबंधित गाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर मिळते. त्यामुळे चार्ट तयार होण्यापूर्वी तिकीट रद्द करण्याची घाई करण्याची गरज नाही. चार्ट तयार झाल्यावर त्यांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी होऊ शकते. १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेत १६६ प्रवासी वेटिंगमधून आरएसी, १७० प्रवासी वेटिंगमधून कन्फर्म झाले. ३५५ प्रवासी आरएसीतून कन्फर्म झाले तर ५४२ प्रवासी अपग्रेड झाले. २ एप्रिलला ४३९ प्रवासी वेटिंगमधून आरएसी, १३६ प्रवासी वेटिंगमधून कन्फर्म, १३२ प्रवासी आरएसीतून कन्फर्म, तर ३२३ प्रवासी अपग्रेड झाल्याची नोंद आहे.त्यामुळे चार्ट तयार होईपर्यंत वाट पाहून प्रवाशांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे.