शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

३१ ऑक्टोबरला रात्री ८.१० वाजता नागपुरात दिसणार 'ब्ल्यू मून'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:39 PM

Nagpur News ३१ ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत ७ अंश ११ कला व २४ विकलावर राहणार असून त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ३१ ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत ७ अंश ११ कला व २४ विकलावर राहणार असून त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे. साधारणत: दर महिन्यात एकदाच पूर्ण चंद्र दिसतो. परंतु, ऑक्टोबर महिन्यात दोनदा हा योग आला आहे. २ ऑक्टोबरनंतर ३१ ऑक्टोबरला हा योग येत आहे. ज्यावेळी एकाच महिन्यात दोनदा असे पूर्ण चंद्र दर्शन होते, त्यावेळी दुसऱ्या पूर्ण चंद्र दर्शनाला ब्ल्यू मून दर्शन असे म्हणतात, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.३० जून २००७ ला अशी घटना घडली होती. ३१ ऑक्टोबरनंतर असा योग आता थेट ३० सप्टेंबर २०५० ला येईल. अर्थात ३१ जानेवारी व ३१ मार्च २०१८ ला आपण ब्ल्यू मून बघितला होता. अशा रितीचा ब्ल्यू मून ज्योतिषशास्त्रानुसार ३१ ऑगस्ट २०२३ ला बघता येईल, असेही डॉ. वैद्य सांगतात. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. परंतु चंद्र जेव्हा क्षितिजापासून भ्रमण करताना अधिक उंचावर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात यावेळी करड्या छटा मिसळल्यामुळे तो निळसर भासू लागतो. मात्र ब्ल्यू मून व्याख्येचा व त्याच्या रंगाचा काहीही संबंध नाही.या ब्ल्यू मून प्रसंगामुळे 'वन्स इन अ ब्ल्यू मून' असे म्हणण्याची प्रथा १७ व्या शतकापासून सुरू झाली, अशी माहिती डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. प्रत्येकाने ब्ल्यू मून पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :scienceविज्ञान