दारूच्या वादातून खून

By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30

गुरुवारी रात्री सिरसपेठ, कोतवालीत झालेल्या खट्या ऊर्फ धीरज मुकेश कांबळे याच्या खुनातील आरोपीला अटक

Blood from the promise of alcohol | दारूच्या वादातून खून

दारूच्या वादातून खून

नागपूर : गुरुवारी रात्री सिरसपेठ, कोतवालीत झालेल्या खट्या ऊर्फ धीरज मुकेश कांबळे याच्या खुनातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादातून खट्याचा जीव गेल्याचे तपासात उघड झाले आहे.
खट्या बंडीवर कबाड विकत घ्यायचा. तो गुरुवारी रात्री दारूच्या नशेत होता. तेवढ्यात तेथे त्याचा नातेवाईक आरोपी विनोद नामदेव रामटेके (वय ५०, रा. गुलाबबाबा मठ, सिरसपेठ) आला. खट्याने विनोदला दारू पाज म्हटले. विनोदने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या खट्याने विनोदवर हल्ला केला. परिणामी विनोदने धारदार शस्त्राने खट्याच्या छाती आणि पोटावर घाव घातले. गंभीर अवस्थेत खट्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर कोतवालीचे पोलीस आणि गुन्हेशाखेच्या पथकाने संयुक्तपणे शोध घेत आरोपी विनोदला अटक केली.(प्रतिनिधी)

Web Title: Blood from the promise of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.