सुमन विहार सोसायटीच्या नागरिकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:22+5:302021-07-19T04:07:22+5:30

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोकमतने राबविलेल्या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेत रविवारी सुमन विहार सोसायटी, कामठी रोड येथील तरुण ...

Blood donation by citizens of Suman Vihar Society | सुमन विहार सोसायटीच्या नागरिकांनी केले रक्तदान

सुमन विहार सोसायटीच्या नागरिकांनी केले रक्तदान

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोकमतने राबविलेल्या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेत रविवारी सुमन विहार सोसायटी, कामठी रोड येथील तरुण व नागरिकांनी सहभाग घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकमतच्या आवाहनाला साद देत आयोजित या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने तरुण व नागरिकांनी रक्तदान केले. ज्येष्ठ नागरिक मेहताबसिंह ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष के.एस. ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. विशाल कामदार, सचिव तारकेश्वर गुप्ता उपस्थित होते. ३९ दात्यांनी यावेळी रक्तदान केले. तिरपुडे ब्लड सेंटरचे सीईओ संजय भट, पीयूष भट, अमित साहनी, बिपीन साहनी, हिना वाघ, साहित सय्यद, सुमीत चव्हाण, राज मिश्रा, डॉ. तन्वी महाजन, रक्षणा बोरकर, सिद्धांत विरूळकर, सुशिल बागडे, सविता खवासे, खिलेंद्र बिसेन यांचे सहकार्य लाभले.

.............

Web Title: Blood donation by citizens of Suman Vihar Society