व्हीआयएमध्ये रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:58+5:302021-07-17T04:07:58+5:30
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) सिव्हिल लाइन्स येथील उद्योग भवनातील सभागृहात शुक्रवारी आयोजित रक्तदान ...

व्हीआयएमध्ये रक्तदान शिबिर
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) सिव्हिल लाइन्स येथील उद्योग भवनातील सभागृहात शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिरात २२ उद्योजक व महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांच्या हस्ते करण्यात आले. महामारीच्या काळात रक्तदान सामाजिक गरज असून, सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावे. लोकमत समूहाचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे राठी म्हणाले. आयोजन लाइफलाइन रक्तपेढीच्या सहकार्याने करण्यात आले.
शिबिरात उद्योजक आणि त्यांचे कुटुंबीय आणि महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुद्धे, माजी अध्यक्ष प्रफुल दोशी, सहसचिव अनिता राव, महिला विंगच्या अध्यक्षा पूनम लाला, सचिव रश्मी कुळकणी, माजी अध्यक्ष मनीषा बावनकर, रिता लांजेवार, वाय रमाणी, नीलम बोवाडे, वंदना शर्मा, योगिता देशमुख, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, व्हीआयएचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी राजेश वैश्य, पंकज बोखारे, विठ्ठल सिडाम, संजय मनगटे आणि लाइफलाइन रक्तपेढीतर्फे डॉ. अनिता देशकर, रवी गजभिये, अंकिता सांगोळे, विजय घोडेस्वार, डॉ. अर्पणा सागरे, कोमल जगनाडे, रिया ढोमणे, हरीश ठाकूर, मंगेश राणे, वैभव बाराहाते, उत्कृर्ष उके, गौरव चांदेकर उपस्थित होते.