शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:09 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सोमवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरक्तदात्यांसाठी भेटवस्तू व प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सोमवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे.निरंतर निष्काम कर्म आणि सेवाकार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत ‘लोकमत’च्यावतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते, म्हणूनच रक्तदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीतजास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषत: ‘लोकमत’चे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी व रक्तदान करणाऱ्यांनी लोकमत भवन रामदासपेठ येथे ९९२२२०००६३ व ९८८१७४८७९० वर संपर्क साधावा.रक्तदात्यांसाठी भेटवस्तू व प्रमाणपत्र‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाºयांना भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाnagpurनागपूर