६२ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:50+5:302020-12-26T04:08:50+5:30
---- आकर्षक विद्युत दिव्यांनी वेधले लक्ष : ख्रिसमसचे आनंदी पर्व दरवर्षी थाटात साजरे होते. यंदा कोरोनामुळे काही अडचणी उद्भवल्या. ...

६२ दात्यांनी केले रक्तदान
----
आकर्षक विद्युत दिव्यांनी वेधले लक्ष : ख्रिसमसचे आनंदी पर्व दरवर्षी थाटात साजरे होते. यंदा कोरोनामुळे काही अडचणी उद्भवल्या. अशाही परिस्थितीत उमरेड वेकोलि स्थित संत फ्रान्सिस असिसी चर्च येथील इमारत ख्रिसमसच्या निमित्ताने आकर्षक विद्युत दिव्यांनी सजविण्यात आली. या दिव्यांनी लक्ष वेधले.
----
तरुणांनी जात प्रमाणपत्र जाळले
उमरेड : जात हे विषमतेचे प्रतीक आहे. आम्हाला जाती व्यवस्था मान्य नाही. सकारात्मक परिवर्तनासाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेश देण्यासाठी शुक्रवारी उमरेड येथे दोन तरुणांनी जात प्रमाणपत्र जाळून मनुस्मृती दहन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. रवी हाडे आणि संजय मनवर असे या दोन तरुणांचे नाव आहे. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. बुद्धवंदना करण्यात आली.
---