शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांनीच केले मित्राला ब्लॅकमेल

By admin | Updated: January 7, 2016 03:43 IST

एका शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षिका आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याच्या मुलांनी मिळून ....

१० हजार रुपये उकळले : पोलिसांनी सावधगिरीने हाताळले प्रकरण नागपूर : एका शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षिका आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याच्या मुलांनी मिळून एका आर्किटेक्टच्या मुलाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलाचे वडील गडचिरोली येथे आर्किटेक्ट आहेत. ते आपल्या परिवारासह सोनेगाव परिसरातील उज्ज्वलनगर येथे राहतात. त्यांचा मुलगा हा शहरातील एका नामांकित शाळेत शिकतो. परिसरात राहणारे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी, एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेच्या मुलांशी त्याची मैत्री आहे. हे चारही जण १२ ते १५ वर्ष वयोगटातील असून सातवी ते बाराव्या वर्गात शिकतात. काही दिवसांपूर्वी आर्किटेक्टच्या मुलाने मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी वडिलांच्या खिशातून ५०० रुपये काढले. त्याची माहिती त्याच्या तीन मित्रांना मिळाली. त्यानंतर इतर तिघांनी संगनमत करून या मुलाला धमकावले. वडिलांना सांगण्याची धमकी दिली. तसेच न सांगण्यासाठी ५ हजार रुपये आणण्यास सांगितले. त्यावेळी आई-वडिलांच्या भीतीमुळे त्याने आईच्या पर्समधून ५ हजार रुपये काढून मित्रांना दिले. थर्टी फर्स्टच्या दिवशी पुन्हा त्यांनी आर्किटेक्टच्या मुलला धमकावून ५ हजार रुपये आणण्यास सांगितले. त्याने पुन्हा आईच्या पर्समधून पैसे काढून त्यांना दिले. दोन वेळा घरातून पैसे चोरीला गेल्याने आर्किटेक्टच्या पत्नीने मुलाची चौकशी केली. तेव्हा त्याने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. त्या मुलांनी मंगळवारी पुन्हा १० हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा मुलाने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी थेट गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणातील सर्व मुले ही चांगल्या घरची असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी सावधगिरीने प्रकरण हाताळले. तिन्ही मुलांना आई-वडिलांसह बोलावून घेतले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही त्यांच्या पालकांसमोर समज देऊन सोडून दिले.(प्रतिनिधी)