लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:54 IST2020-05-23T23:52:38+5:302020-05-23T23:54:07+5:30
कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अटक करून त्यांच्याकडून ५६ हजार ६१६ रुपयांची २० आरक्षणाची तिकिटे जप्त केली आहेत.

लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अटक करून त्यांच्याकडून ५६ हजार ६१६ रुपयांची २० आरक्षणाची तिकिटे जप्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याच्या सतनामीनगर माता मंदिराच्या जवळ मातोश्री अपार्टमेंट फ्लॅट नं ४०४ वर आरपीएफच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकला. त्यात जयेश छटवार (५०) हा दलाल सापडला. आरपीएफने त्याच्याकडून १ लॅपटॉप जप्त केले. त्यात वेगवेगळ्या नावाने १० बनावट आयडी आढळल्या. सॉफ्टवेअर उघडल्यानंतर त्यात ३ लाईव्ह तिकिटे किंमत २७ हजार ७८, जुन्या आरक्षणाच्या तिकीट २९ हजार ५३८ रुपये मिळाल्या. चौकशी केली असता तो प्रत्येक तिकिटाच्या मागे २०० ते ३०० रुपये अधिक घेत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून १ लॅपटॉप, १ डोंगल, १ मोबाईल, १ प्रिंटरसह ८८ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल मिळाला.