शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात दिवाळी काळवंडली : चौघांवर मृत्यूचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:07 IST

दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी असून, ते चांगले मित्रदेखील होते. अपघाताची ही दुर्दैवी घटना सावनेर शहरालगत छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर बुधवारी (दि. ७) सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी : तिघेही सिरोंजी येथील विद्यालयाचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असला तरी दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे दोन घरांमधील कर्ते पुरुष केल्याने तसेच एक गंभीर जखमी झाल्याने ‘त्या’ तिन्ही घरांमधील दिवाळी काळवंडली. विशेष म्हणजे, तिघेही एका विद्यालयातील कर्मचारी असून, ते चांगले मित्रदेखील होते. अपघाताची ही दुर्दैवी घटना सावनेर शहरालगत छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर बुधवारी (दि. ७) सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.हेमंत भाऊराव लाडे (५२, रा. मेंढला, ता. नरखेड), नागोराव बनसिंगे (४१, रा. सावनेर) अशी मृतांची तर दुर्गेश्वर चौधरी (४८, रा. सावनेर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही सिरोंजी (ता. सावनेर) येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाचे कर्मचारी असून, दुर्गेश्वर चौधरी हे सहायक शिक्षकपदी कार्यरत आहेत. हेमंत लाडे हे लिपिक तर नागोराव बनसिंगे हे प्रयोगशाळा परिचरपदी कार्यरत होते. तिघेही सावनेर शहरातच राहायचे. तिघेही नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले होते. ते शहरातील शिवमंदिरापासून अर्धा कि.मी. गेले आणि उड्डाणपुलापासून परत येत असताना केळवद (ता. सावनेर)हून सावनेरकडे वेगात येत असलेल्या एमएच-३१/ईएन-०७८३ क्रमांकाच्या बोलेरोने तिघांनाही उडविले.हेमंत हे गाडीला अडकल्याने ५० मीटरपर्यंत फरफटत गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर बनसिंगे यांचा मनका तुटला आणि चौधरी यांचा पाय फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर इजा झाली. त्या दोघांनाही सावनेर येथील रुग्णालयात आणले. मात्र, बनसिंगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. चौधरी यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. अपघातानंतर जीपचालकाने जीपसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पुढे अन्य एका वाहनाला सौम्य धडक दिली आणि जीप रोडच्या कडेला असलेल्या खांबावर धडकली. जीपचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून जीपचालक दिलीप परसराम वाघाडे (४६, रा. सावनेर) यास अटक केली.पितृछत्र हरपलेहेमंत लाडे यांना दोन मुले असून, त्यांचा मोठा मुलगा अक्षय हा पोलिओग्रस्त आहे तर लहान मुलगा इयत्ता १२ वीला विज्ञान शाखेत शिकत आहे. नागोराव बनसिंगे यांना चार वर्षांचा मुलगा आणि १२ व १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. पित्याचे अपघाती निधन झाल्याने या मुलांचे पितृछत्र हरपले. शिवाय, लाडे व बनसिंगे कुटुंबीयांवर ऐन दिवाळीच्या दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला.अन् लक्ष्मी गेलीदिवाळीच्या तयारी दरम्यान कविता सुभाष वानखडे (४३, रा. काटोल) प्रकृती खराब झाली. ‘प्लेटस्लेटस्’ कमी झाल्याचे डॉक्टांनी रक्तचाचणीनंतर सांगताच त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले. दुर्दैवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार दि. ७) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अन् घरची लक्ष्मी कायमची गेली. मुलींमध्ये त्या आईवडिलांना एकुलत्या एक होत्या. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी बहिणीला खांदा देण्याचे दुर्दैवही भावाच्या नशिबी आले. त्यांचा मुलगा व मुलगी आईविना पोरकी झालीत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू