राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:44 IST2017-10-12T01:44:07+5:302017-10-12T01:44:24+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघवर्तुळ व भाजपातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात संघवर्तुळ व भाजपातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे असल्याचा आरोप लावत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी व युवा मोर्चातर्फे बुधवारी बडकस चौकात निदर्शने करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावरदेखील त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ४ च्या सुमारास बडकस चौकात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते एकत्र आले.
राहुल गांधी यांनी अभ्यास करून बोलावे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांचा पुतळादेखील जाळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आ. गिरीश व्यास, महिला मोर्चा महामंत्री नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच चेतना टांक, वंदना यंगटवार, ,सारिका ंनांदूरकर, सीमा ढोमणे, लता येरखेडे, दिव्या धुरडे, मनीषा काशीकर, प्रीती राजदेरकर, मंगला गोतमारे,निशा भोयर, रश्मी फडणवीस, बाल्या रारोकर, दीपांशु लिंगायत, कल्पना पजारे, मनिषा कोठे, स्नेहल बिहारे, स्वाती आखतकर, रिता मुळे, मंगला खेकरे, स्मिता चकोले, वंदना भुरे, मनीषा धावड़े, सुरभी तिडके,यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.