शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा फायदा, तृणमूलची घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना तेथे रंगताना दिसून येत आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी ओपिनियन पोल समोर आणले असून या सर्वांची सरासरी काढली असता तृणमूलची घसरगुंडी व भाजपचा फायदा असे चित्र दिसून येत आहे. डावे पक्ष व काँग्रेसच्या आघाडी स्पर्धेतही नसणार असल्याचे अंदाज यातून वर्तविण्यात आले आहे.

मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूलला २११ व भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाओपिनियन पोलनुसार भाजपला सरासरी १३८ जागा मिळतील, तर तृणमूलला १३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २९४ च्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बहुमतासाठी १४८ चा आकडा आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये बहुमतासाठी चढाओढ असेल.

भाजपा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, तर ममता बॅनर्जींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. या महाओपिनियन पोलसाठी वापरण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

ओपिनियन पोल - भाजप - तृणमूल - काँग्रेस व डावे

पीपल्स प्लस - १८३ - ९५ - १६

सीएनएक्स - १३५ - १४१ - १८

टाइम्स नाऊ - सी व्होटर - ११२ - १६० - २२

टीव्ही ९ - पोलस्ट्रॅट - १२२ - १४६- २३