शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

खळबळजनक सुसाईट नोट; भाजप महिला नेत्याच्या पतीची नागपुरात रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 09:46 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकविल्याचा सुसाइड नाेटमध्ये दावा

नागपूर : बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावून गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी नागपुरात ही घटना घडली.  शुक्रवारी त्याचा उलगडा झाला. अविनाश मनतकार (६०, रा. तेल्हारा, जि. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अविनाश यांच्या पत्नी नयना या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते.  मनतकर यांचे पुत्र अभिलाष यांनी  म्हटले की, या प्रकरणामुळे वडील प्रचंड व्यथित होते. त्यांना पेट्रोल पंपदेखील विकावा लागला होता. 

शेगावला जायचे सांगून निघाले ते परतलेच नाहीमनतकार यांच्या निकटस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनतकार हे तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित होते. गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात आले. अविनाश हे त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे आहे, असे सांगून निघाले. रात्र झाली तरी ते परतले नाही. त्यांच्याकडे मोबाइलही नव्हता. त्यामुळे नयना यांनी नातेवाइकांना कळवून शाेधाशाेध केली.

खळबळजनक सुसाइड नोट मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वत:चा भ्रष्टाचार आमच्यावर लावून आम्हा पती-पत्नीला फसविले. या प्रकरणात संचालक मंडळ दोषी आहे की नाही, याची पोलिसांनी चाैकशी केली नाही. संचेती-लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे. रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पो. नि. शेळके यांनी ३८ लाख रुपये घेतल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर