विकेंड लॉकडाऊनला भाजप सहकार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:16+5:302021-04-05T04:08:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने शनिवार ...

BJP will support weekend lockdown | विकेंड लॉकडाऊनला भाजप सहकार्य करणार

विकेंड लॉकडाऊनला भाजप सहकार्य करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने शनिवार व रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजप नेते व कार्यकर्ते सहकार्य करतील. सरकारनेदेखील समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांचा विचार करुन मदतीसंदर्भात घोषणा केली पाहिजे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्या वाढते आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविरोधात सर्वांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. परंतु सरकारनेदेखील नवीन स्ट्रेनमुळे नेमका संसर्ग वेगाने का पसरतोय याबाबतची कारणे शोधली पाहिजे. मुंबई, पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेतच, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. मात्र मुंबई, पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, त्याचादेखील विचार व्हावा. आताच्या परिस्थितीला सक्षम करण्यासाठी राज्य सरकारला आरोग्यसेवा बनवावी लागेल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

सरकारीने वीज जोडणी कापणे बंद करावे

राज्य शासनाने सक्तीची कारवाई करून वीज ग्राहकांकडून ४ ते ५ हजार कोटींचा निधी जमविला आहे. आता परत स्थिती खराब होत असल्याने शासनाने वीज जोडणी कापणे बंद केले पाहिजे. वीज जोडणी कापण्याची मोहीम सुरू ठेवली तर तो तुघलकी निर्ण़य ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

शासनाची अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्राकडे बोट

संजय राऊत आणि आघाडीतील नेते आपली अकार्यक्षमता लपवण्याकरिता केंद्र सरकारवर बोटं दाखवतात. केंद्राने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत केली आहे. मी पुराव्यासाहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवले आहे. सरकारने आमच्याकडून मदत मागायची पाठिंबा मागायचा आणि त्यांनी राजकारण करायचं हे योग्य नाही, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP will support weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.