नंदीग्राममध्ये भाजपा-तृणमूल आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:07 IST2021-03-18T04:07:55+5:302021-03-18T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदीग्राम - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उभ्या असलेल्या नंदीग्राम विधानसभेच्या जागेवर भाजप व तृणमूल काँग्रेस दोघेही आक्रमक ...

नंदीग्राममध्ये भाजपा-तृणमूल आमनेसामने
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदीग्राम - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उभ्या असलेल्या नंदीग्राम विधानसभेच्या जागेवर भाजप व तृणमूल काँग्रेस दोघेही आक्रमक झाले आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी बॅनर्जी यांनी गुन्हेगार खटले लपविल्याची तक्रार करत त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलकडून अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांचे मतदारयादीत दोन ठिकाणी नाव असल्याचा आरोप तृणमूलचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन यांनी केला आहे.
तृणमूलतर्फे नंदीग्रामच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. शुभेंदू अधिकारी यांचे नाव नंदीग्राम व हल्दिया येथील मतदारयादीत आहे. मागील सहा महिन्यापासून शुभेंदू अधिकारी नंदीग्राम येथील रहिवासी नाहीत. त्यामुळे ते तेथील मतदार होऊ शकत नाही. नंदीग्राम येथील मतदारयादीतून त्यांचे नाव कापण्यात यावे व त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसाअगोदर अधिकारी यांनी बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार केली होती. नामांकन अर्जात बॅनर्जी यांनी सहा गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपविली आहे. यात सीबीआयच्या एका प्रकरणाचादेखील समावेश असल्याचा त्यांनी दावा केला होता.