महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही
By कमलेश वानखेडे | Updated: May 13, 2023 16:58 IST2023-05-13T16:57:30+5:302023-05-13T16:58:11+5:30
Nagpur News जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे कर्नाटकच्या निकालाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही
कमलेश वानखेडे
नागपूर : कर्नाटक मध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेही कर्नाटक मध्ये १९८५ कुठलेही सरकार रिपीट होत नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाले त्यात पॉइंट मते कमी झाली, पण जागा कमी झाल्या. जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे कर्नाटकच्या निकालाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असे वाटत आहे. पण त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वार्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शहा मोदींचा पराभव दिसतो. 'बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना' अशी काही लोकांची स्थिती आहे.
उत्तर प्रदेश मधल्या लोकल बॉडीचे निकाल पहा, भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो, असे म्हणतात. कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. मुंगेरी लाल के हसीन सपने कधी पूर्ण नाही होणार नाही, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.
राष्ट्रवादीचे पार्सल परत
- शरद पवारांना तर कर्नाटकमध्ये एक जागाही मिळाली नाही. मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले, अशी टीकाही फडणवीस यांनी पवार यांच्यावर केली.