शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:52 IST

तब्बल पाच दिवस चाललेल्या मनपा महासभेला विधिमंडळाच्या अधिवेशनाचे स्वरूप आले होते. मागील १३ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप पदाधिकारी, नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यात कमालीचे हतबल दिसत आहेत. यापूर्वीही राज्यात काँग्रेस आघाडीची तर महापालिकेत भाजपची सत्ता होती. पण अशी हतबलता दिसली नाही. म्हणूनच मनपात १०८ नगरसेवक असताना भाजपला काँग्रेस सदस्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजेच काँग्रेसच्या खांद्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य करावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल पाच दिवस चाललेल्या मनपा महासभेला विधिमंडळाच्या अधिवेशनाचे स्वरूप आले होते. मागील १३ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप पदाधिकारी, नगरसेवक गेल्या तीन-चार महिन्यात कमालीचे हतबल दिसत आहेत. यापूर्वीही राज्यात काँग्रेस आघाडीची तर महापालिकेत भाजपची सत्ता होती. पण अशी हतबलता दिसली नाही. म्हणूनच मनपात १०८ नगरसेवक असताना भाजपला काँग्रेस सदस्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजेच काँग्रेसच्या खांद्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य करावे लागले.आर्थिक कारण देत कार्यादेश झालेल्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्याने नगरसेवकांत रोष आहे. पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही आयुक्तांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक नाराज आहेत. आयुक्त हुकूमशहासारखे वागतात. ते आल्यापासून शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचा सत्तापक्षाचा आरोप आहे. आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील संघर्ष विचारात घेता सत्तापक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणून आयुक्तांना सभागृहात जाब विचारला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सत्ताधाºयांनी काँग्रेसला पुढे करून आयुक्तांना लक्ष्य केले. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे व शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी आयुक्तांची पाठराखण केली.काँग्रेसमध्ये फुल्ल लोकशाही!नितीन साठवणे यांच्यावर दाखल गुन्ह्यासंदर्भात वेगळ्या आयुधाचा वापर करूनही हा मुद्दा विरोधी पक्षाला उपस्थित करता आला असता. दुसरीकडे महापौरांनाही हा स्थगन नाकारता आला असता. परंतु भाजपला प्रस्तावाच्या माध्यमातून आयतीच संधी मिळाली. पण भाजपने आयुक्तांना लक्ष्य केल्यानंतर काँग्रेस सावध झाली.काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी चर्चेदरम्यान सत्तापक्षाला लक्ष्य केले. पण विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आयुक्तांसह अधिकाºयांना धारेवर धरले. बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी उघडपणे आयुक्तांची बाजू घेतली. स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सत्ताधाºयांवर टीका करावी की आयुक्तांवर, अशा गोंधळात काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यामुळे प्रत्येकाने आपली वेगवेगळी भूमिका मांडून पक्षात फुल्ल लोकशाही असल्याचे स्पष्ट केले.सोशल मीडियावरील टीकेमुळे भाजप व्यथितभाजपचे ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या प्रदीर्घ भाषणात आयुक्तांना धारेवर धरले. विलगीकरण केंद्र, रुग्णालयाची निर्मिती, निवारा केंद्र, कोरोनाबाधित रुग्णांचे तपासणी अहवाल, वेगवेगळ्या भागात करण्यात आलेले सर्वेक्षण आणि आयुक्तांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून केलेली प्रसिद्धी याचा जाब विचारला. पण सत्तापक्षाच्या नगरसेवकांवर सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे भाजप नगरसेवक अधिक व्यथित दिसले. ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, पिंटू झलके, वैशाली नारनवरे यांनीही प्रशासनाच्या कार्यशैलीवर टीका केली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcongressकाँग्रेसBJPभाजपा